स्व.गोपिनाथरावजी मुंडे जयंती 2015 लातुर येथे आयोजित केली मोठ्या संखेने कार्यकर्ते मिरवनुकीला उपस्थित होते

ऋषिकेश विघ्ने मित्र मंडळ,महाराष्ट्र

साहेब जयंती उत्सव 2015 ला सर्व कार्यकर्ते व ऋषिकेश विघ्ने

सार्वजनिक शिवजयंती रैली मधे आज सहभाग घेतला – ऋषिकेश विघ्ने

लातूर येथे भव्य दिव्य सार्वजनिक शिवजयंती दरम्यान जय भगवान महासंघाचे प्रदेश मंत्री ऋषिकेश विघ्ने व इतर
30 हजार गाड्यांची रैली काढण्यात आली.

image

ऑलिंपिकची अंतिम फेरी गाठणार्या ललिता बाबरचे ना. पंकजाताई मुंडेंकडून कौतुक

मुंबई दि. 22 (प्रतिनिधी):-रिओ ऑलिम्पिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या ललिता बाबर हिचा राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात सत्कार करून कौतुक केले.

image

    ऑलिंपिकचे महत्त्व हे अन्य स्पर्धेपेक्षा वेगळे असते. ऑलिंपिकमधील केवळ सहभागच कठीण नसतो, तर ऑलिंपिकसाठी पात्र ठरणेदेखील कठीण असते. त्यासाठी असलेले पात्रता निकष पार करणे हे सर्वांत मोठे आव्हान असते. अशी सर्व कठीण परीक्षा देऊन ऑलिंपिकमध्ये ललीताला सहभागी होता आले याचा अभिमान वाटतो असे ना. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.

    ललिता बाबरने तीन हजार स्टिपलचेस शर्यतीत अंतिम फेरी गाठली होती. ऑलिंपिक स्पर्धेत ऍथलेटिक्‍समध्ये अंतिम फेरी गाठणारी ललिता ही पी. टी. उषानंतरची दुसरीच धावपटू ठरली होती. अंतिम फेरीत तिला अपयश आले; पण तिने अंतिम फेरीपर्यंत घेतलेली धावदेखील तेवढीच महत्त्वाची होती.

आज ललिताने राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बाल विकास मंत्री ना. पंकजा गोपीनाथ मुंडे यांची सहयाद्री अतिथी गृह, येथे भेट घेतली. ऑलिंपिक स्पर्धेत ऍथलेटिक्‍समध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल  ना. पंकजा मुंडे यांनी ललीताचे कौतुक केले व यावर्षी भारतात होणाऱ्या  आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी तिला दिल्या. प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. पांडुरंग फुंडकर, ना. चंद्रकांत पाटील, ना. विनोद तावडे व मुख्य सचिव स्वाधीन क्षञिय उपस्थित होते.
■■■■

वाघिरा येथे भगवान बाबा जयंती उत्साहात साजरी

वाघिरा (प्रतिनिधी) दि.22:-
राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त सकाळी 8 वाजता वाघिरा गावात जनजागर रॅली काढण्यात आली.नंतर बाबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले यावेळी जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री.बाबासाहेब शिंदे तर प्रमुख उपस्थिति समाजकल्यान विभागाचे सभापती महेंद्र गर्जे होते.तसेच विद्यार्थांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

दुपारी 4 वाजता माजी राज्यमंत्री सुरेश आण्णा धस यांच्या हस्ते महेंद्र गर्जे सभापती असलेल्या समाजकल्याण विभागामार्फत 7 लक्ष रूपयांच्या बुद्ध विहाराचे भुमीपुजन आज वाघिरा नगरीत करण्यात आहे.शेतकर्यांच्या व दुध व्यवसायीकांच्या विविध समस्या विषयी चर्चा माजी राज्यमंत्री सुरेश आण्णा धस यांच्या उपस्थितित करण्यात आली.

जयंती कार्यक्रमास उपस्थित वाघिरा गावचे सरपंच नारायण बांगर,बाबुराव बावणे,सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश विघ्ने,शेषेराव बांगर,बाळासाहेब बांगर,पाखरे सर,कुदळे सर यांच्यासह वाघिरा व मेंगडेवाडी येथील ग्रामस्थ,विद्यार्थी मोठ्या संख्येने होते
■■■■

Maharashtra Open army Recruiting rally 2016-17

Zone 4th – Andhra Pradesh, Gujarat, Kerala, Tamil Nadu, Rajasthan, Maharashtra, Karnataka, Goa and Union Territories  of Dadra and Nagar Haveli, Daman & Diu, Lakshadweep and Pondicherry

118 Infantry Battalion (TA) GRENADIERS
Total Number of vacancies – 39 (Soldier GD-35, Clerk-02, Tradesman Chef-02)
Date of Recruitment – 04 September to 10 September 2016
Location/ Venue – Fort Sitabuldi, Nagpur-1

109 Infantry Battalion (TA) MARATHA LI
Total Number of vacancies – 24 (Soldier GD-22, Clerk-02)
Date of Recruitment – 06 October to 10 October 2016
Location/ Venue – Unit location Kolhapur

116 Infantry Battalion (TA) PARA
Total Number of vacancies – 11 (Soldier GD-09, Tradesmen-02)
Tradesmen: House Keeper-01, Chef-01
Date of Recruitment – 15 September to 20 September 2016
Location/ Venue – Devlali

ऋषिकेश विघ्ने पोलीस भरती विषयी मार्गदर्शन करणारे संकेतस्थळ स्थापन करणार

महाराष्ट्रात पोलीस भरती करणार्या युवकांना सुवर्णसंधी

दि.13 महाराष्ट्र राज्यातील पोलीस भरती करण्याचे ध्येय असणार्या युवक युवतींना पोलीस भरतीसाठी गरजेचे असे संकेतस्थळ जिल्हातील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश विघ्ने यांच्या www.rishikeshvighne.com या संकेतस्थळाअंतर्गत जिल्ह्यातील गोरगरीब होतकरू युवकांना पोलीस भरती बद्दलचे ज्ञान व मार्गदर्शन ऊपलब्ध करणारे नवीन अध्ययावत संकेतस्थळ लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे विघ्ने यांनी  सांगितले आहे.

राज्यात वाढत्या स्मार्टफोन वापरामुळे संकेतस्थळ मोबाईल फ्रेंडली केले जाईल.संकेतस्थळ मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत उपलब्ध करून विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन केले जाईल.

जिल्ह्यात पोलीस भरती बदल मार्गदर्शन व प्रशिक्षण  घेण्यासाठी युवकांना शहर-तालुक्याच्या ठिकाणी दररोज येणेजाने करावे लागते त्यात त्यांचा अनमोल वेळ वाया जातो आईवडील शेतकरी असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीला तोंड देत भरतीचे मार्गदर्शन,प्रशिक्षण घ्यावे लागते.आजकाल प्रत्येकजण मोबाईल वापरतात त्याचा जर प्रत्येक युवकांनी फायदा घेतला तर नोकर्‍या नाहीत ह्या शब्दाचा नायनाट होईल. ह्याचा विचार करून जिल्हातील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश विघ्ने यांनी पोलीस भरतीवर संपुर्ण  मार्गदर्शन, भरती जाहिरात व मोबाईलवर मेसेजिंग स्वरूपात जाहिराती उपलब्ध करून देणारे लोकोपयोगी असे संकेतस्थळ युवक-युवतींसाठी मोफत स्वरूपात सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

जिल्हातील अनुभवी पोलीस भरती साठी मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तींनी संकेतस्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी आणखी कल्पना मो.9881814668 वर संपर्क साधून द्याव्यात असे ऋषिकेश विघ्ने यांनी म्हटले आहे